जिल्ह्यात 46 नवे कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या बाराशेपार

रत्नागिरी:- गेल्या 24 तासांत प्राप्त अहवालांमध्ये एकूण 46 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह ची संख्या आता 1 हजार 210  इतकी झाली आहे. 

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये  जिल्हा कोव्हीड रुग्णालय रत्नागिरी – 7 रुग्ण, घरडा, खेड  12 (यामुळे घरडा केमिकल्स मधील एकूण पॉझिटिव्हची संख्या 110 झाली), उपजिल्हा रुग्णालय कामथे 18, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी 4, दापोली 2, गुहागर 3 येथील रुग्णांचा समावेश आहे.

            संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी –  69, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी –  1,  उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 3,  कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 7, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी – 2, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 4, ग्रामीण रुग्णालय गुहागर-1,  केकेव्ही, दापोली – 25 असे एकूण 112 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

          मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 14  हजार  301  इतकी आहे.

            जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 13 हजार 753  नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 13 हजार 389 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1210 अहवाल पॉजिटीव्ह आले असून  12 हजार 167 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 364 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.   364 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.

                    परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि.  18 जुलै 2020 अखेर एकूण 1 लाख 94 हजार 588 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 98 हजार 662 आहे.