रत्नागिरी:- नव्याने प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जिल्ह्यात 31 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 692 झाली आहे. उक्ताड, चिपळूण येथील एका 83 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात मृतांची संख्या आता 58 झाली आहे.
आज पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय रत्नागिरी येथील 18 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील ४ रुग्ण, दापोलीतील ८ रुग्ण आणि ॲन्टीजेन टेस्ट केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 501 इतकी आहे.
दरम्यान 31 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 133 झाली आहे. बुधवारी बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथील 11, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही दापोली 1, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 7, कोव्हीड केअर सेंटर घरडा खेड 6, कोव्हीड केअर सेंटर देवधे लांजा 6 आणि ॲन्टीजेन टेस्ट केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.