जिल्ह्यात 24 तासात 82 जण कोरोना पॉझिटिव्ह; 5 जणांच्या मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार केवळ 82 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 52 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 74 हजार 540 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.99 टक्के आहे. नव्याने 82 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 682 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने 5 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 415 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.10 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 472 तर संस्थात्मक विलगीकरणात 255 रुग्ण उपचार घेत आहेत.