जिल्ह्यात 24 तासात 8 जणांचा मृत्यू; दोन दिवसात 14 बळी

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसात 14 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 429 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 कोरोना बाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 522 रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासात उपचारखाली असलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरीत सर्वाधिक 6 तर लांजा आणि गुहागर तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 429 जणांचा मृत्यू झाला आहे.