रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत असल्याच चित्र आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 60 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 60 पैकी 27 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 33 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत.
रविवारी जिल्ह्यात 60 नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात आतापर्यंत 11 हजार 438 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. रविवारी 194 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 1 लाख 2 हजार 226 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रविवारी 103 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10 हजार 356 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.









