रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 584 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 408 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 176 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील 47 पॉझिटिव्ह रुग्णांची आज नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या वाढून 44 हजार 009 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या शनिवारी 582 तर रविवारी 567 सोमवारी 429, मंगळवारी 567, बुधवारी 525, गुरुवारी 538, शुक्रवारी 683, शनिवारी 484 रुग्ण सापडले होते. नव्याने 584 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 716 पैकी 408 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 850 पैकी 176 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 44 हजार 009 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 18 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये आज 9 जणांचा मृत्यू झाला असून अगोदर मृत्यू झालेल्या 9 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 519 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर 3.45 टक्क्यांवर आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 444 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.