जिल्ह्यात 24 तासात 389 जण कोरोना बाधित 

रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात 389 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आजपासून जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लॉकडॉऊनच्या पहिल्याच दिवशी रुग्णसंख्या कमी आल्याचे दिलासादायक चित्र आहे. 389 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 38 हजार 461 झाली आहे. 

मागील 24 तासात 8 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने झालेल्या 8 मृत्यू पैकी रत्नागिरी 2, चिपळूण 2, गुहागर 1 आणि दापोली तालुक्यात 3  मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 279 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 365 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 247, खेड 132, गुहागर 92, दापोली 115, संगमेश्वर 156, लांजा 68, राजापूर 92 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.32% आहे

जिल्ह्यात शुक्रवारी 416, शनिवारी 494, रविवारी 508 तर सोमवारी 395, मंगळवारी 655 तर बुधवारी 610 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. बुधवारी पुन्हा 610 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 916 पैकी 182 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 824 पैकी 207 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.