रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 372 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 147 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 225 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 1356 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवे 372 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 32 हजार 444 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी 345, बुधवारी 343, गुरुवारी 339 तर शुक्रवारी 450 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 372 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 147 रुग्ण आरटीपीसीआर तर 225 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 32 हजार 444 वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण 17.31% आहे.
मागील 24 तासात 1356 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 493 जणांपैकी 346 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1235 पैकी 1010 निगेटिव्ह आले आहेत. गेल्या चोवीस तासांत 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 1046 जणांचा बळी गेला आहे.जिल्ह्यातील मृत्यूदर 3.22% आहे.