रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 343 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 142 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 201 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 1291 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवे 343 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 31 हजार 283 झाली आहे. जिल्ह्यात आज 16 मृत्यूंची नोंद झाली असून 432 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात शनिवारी 502, रविवारी 486 तर सोमवारी 259, मंगळवारी 345 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. बुधवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 343 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 142 रुग्ण आरटीपीसीआर तर 201 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 31 हजार 283 वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात 432 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 25923 जण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 82.86% आहे.
मागील 24 तासात 1291 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 330 जणांपैकी 188 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1304 पैकी 1103 निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आज 16 मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 960 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 3.06% आहे.