रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 293 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत बारा जणांचा मृत्यू झाला आहे.
नव्याने 293 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 67 हजार 19 रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत 3 हजार 558 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 4 लाख 43 हजार 763 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
24 तासात 530 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 61 हजार 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोणामुक्तीचे प्रमाण 91.67 टक्के आहे. 24 तासात 12 मृत्यू झाले असून मृत्यूचे प्रमाण 2. 86 टक्के आहे.









