रत्नागिरी:– मागील 24 तासात 173 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 10 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 173 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 73 हजार 843 इतकी झाली आहे. 24 तासात 5 हजार 557 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत 5 लाख 88 हजार 331 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यँत 69 हजार 891 रुग्ण बरे झाले आहेत. तर 24 तासात 188 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत.
जिल्ह्यात नव्याने 10 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 10 पैकी 24 तासातील 5 त्यापूर्वीचे 5 असे 10 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 186 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.96 तर रिकव्हरी दर 94.65 टक्के आहे.









