जिल्ह्यात 24 तासात 157 पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 157 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने पॉझिटिव्ह रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 हजार 529 वर पोचली आहे. 
 

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. मात्र शुक्रवारी माहिती कार्यालयाकडून आलेल्या अहवालांमुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 157 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 
 

नव्याने आलेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्ट केलेले 70 आणि अँटिजेन टेस्ट केलेले 87 असे एकूण 157 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 65 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय खेड 28, गुहागर 21, चिपळूण 30, संगमेश्वर 10, लांजा 3 असे रुग्ण सापडले आहेत.