रत्नागिरी:- जिल्ह्यात 148 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून चिपळूण तालुक्यात सर्वाधिक 65 गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन आहेत.
जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 546 आहे. शुक्रवारी जुना माळनाका, कोतवडे सनगरेवाडी, लांजेकर कम्पाऊंड, भागिर्थी अर्पाटमेंट, फिनोलेक्स कॉलनी, क्रांतीनगर, झारणी रोड, आरोग्य मंदिर, स्टँडर्ड अर्पाटमेंट रत्नागिरी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सध्या 148 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 26 गावांमध्ये, दापोली मध्ये 2 गावांमध्ये, खेड मध्ये 35 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 65 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.









