जिल्ह्यात 119 नवे पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 119 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 6 हजार 536 वर पोचली आहे. तसेच मागील 24 तासात पाच जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या दोनशेनजिक पोचली आहे.

जिल्ह्यात कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सलग पाचव्या दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन जण रत्नागिरीतील तर दोन जण चिपळूण तालुक्यातील आहेत.  

मागील चोवीस तासात सापडलेल्या 119 नव्या रुग्णांमध्ये दापोलीतील 5 रुग्ण, खेड 7, गुहागरला 7, चिपळूण तब्बल 36, संगमेश्वर 1, रत्नागिरीत 48, लांजा 13 आणि राजापूर तालुक्यात 2 रुग्ण सापडले आहेत.