पर्यटकांनी आनंद घेताना सुरक्षितता बाळगण्याचे पोलिस अधीक्षकांचे आवाहन
रत्नागिरी:- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. पर्यटकांनी जरूर जिल्ह्यात यावे, सुट्टी आनंदात घालवावी. परंतु सुरक्षेची काळजी देखील महत्त्वाची आहे. त्यासाठी समुद्रकिनारी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. समुद्रात उतरताना आताताईपणा करू नका, पाण्याचा अंदाज, माहिती घेऊनच उतरा. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी करून पर्यटकांच्या वाहनांची तपासणी सुरू आहे. चालकाची ब्रिथॲनालायझरद्वारे तपासणी होत आहे. मद्य प्राशन करून दारू पिणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पर्यटकांना केले आहे.
जिल्ह्यात नाताळच्या सुट्टीबरोबर 2024 या वर्षाला गुडबाय करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉज, समुद्र किनारे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळांवर पर्यटकांची गर्दी आहे. राज्यातून येणाऱ्या अनेक पर्यटकांना समुद्राचे मोठे आकर्षण असते. पाण्याचा अंदाज न घेता आताताईपणा करत पाण्यात उतरतात आणि दुर्घटना घडता. तसेच 31 डिसेंबरला होणाऱ्या पार्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणातमध्ये मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे अपघात घडल्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि पर्यटकांना पर्यटनाचा निखळ आनंद मिळण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासन त्यांचे स्वागत करण्यासाठी तयार आहे. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडु नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. वाहतुक कोंडी कुठे होणर नाही, यासाठी पोलिस नेमन्यात आले आहेत. पार्किंग सुविधा निर्माण केल्या आहेत. काही ठिकाणी मार्ग बदलले आहेत. गुहागर, दापोली, रत्नागिरी, राजापूर आदी ठिकाणी पोलिस होमगार्ड, पोलिस तैनात केले आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे मोठे आकर्षण असते. अतिउत्साह आणि आताताईपणामुळे मोठ्या दुर्घटना घडत आहेत. त्यासाठी सागर सुरक्षा रक्षक, मच्छीमार, गावकर आदींची मदत घेतली आहे. तसचे ध्वनिक्षेपकावरून सुचना करण्यात येत आहेत.
नवीन वर्षांच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या पार्ट्यांमुळे अनेक वाहनचालक मद्य प्राशन करून वाहनं चालविल्यामुळे अपघात होतात. हे टाळण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. वाहन चालकांची ब्रिथॲनालायजरद्वारे तपासणी केली जात आहे. मद्य प्राशन केल्याचे आठळ्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी जिल्ह्यात येऊन आनंद घ्यावा, परंतु सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.