जिल्ह्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडणार

रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ७ जानेवारीपर्यंत विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या कुलाबा वेधशाळेकडून तसा इशारा मिळाल्याची माहिती रत्नागिरीच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना कळविली आहे. तसेच आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याची सूचना जिल्ह्यातील नागरिकांना केली आहे. ऐन थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदार चिंतातुर आहे. जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे आंबा पीक अडचणीत येण्याची शक्यता आहे.