जिल्ह्यात पाच जणांवर बेशिस्त वाहने उभी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

रत्नागिरी:- इतर वाहनांना अडथळा निर्माण होईल, अशा सार्वजनिक ठिकाणी वाहने उभी करून ठेवल्याप्रकरणी दापोली, गुहागर, खेड येथील पोलिस ठाण्यात २३ रोजी पाच गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

गुहागर तालुक्यातील आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील आबलोली ते तवसाळ या मार्गावर वाहन उभे ठेवल्याप्रकरणी संदीप जोशी याच्याविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खेड समर्थनगर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रहदारीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने चारचाकी उभी केल्याप्रकरणी संपत पिसे याच्यावर खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर, भरणे नाका येथील पुलाखाली वाहतुकीला अडथळा होईल अशाप्रकारे रिक्षा उभी ठेवल्याप्रकरणी विकास महाले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्णेकडे जाणाऱ्या मार्गावर पिकअप वाहन उभे करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी प्रवीण क्षीरसागर याच्यावर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दापोली ते हर्णे रोडवर तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर वाहन उभे ठेवल्याप्रकरणी दुर्गे याच्यावरही दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.