Monday, May 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी कारवांचीवाडी येथे रुग्णवाहिका- दुचाकी अपघातात चारजण गंभीर जखमी

कारवांचीवाडी येथे रुग्णवाहिका- दुचाकी अपघातात चारजण गंभीर जखमी

रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयाची रुग्णवाहिका आणि दुचाकी यामध्ये कारवांचीवाडी रस्त्यावर भिषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरिल स्वारासह पत्नी मुलगा-मुलगी अशी चार जणं गंभीर जखमी झाले आहे. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना रविवारी (ता. ३०) दुपारी पावणे चारच्या सुमारास रत्नागिरी-हातखंबा मुख्य रस्ता आणि कारवांचीवाडी येथून येणारा फाटा येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयाच्या १०८ रुग्णवाहिकेवर असलेले चालक चेतन मयेकर (रा. वांद्री) हे १०८ रुग्णवाहिका (क्र. एमएच-०८एपी ३८९४) वाहिकेतील नऊ जणांच्या स्टाफला घेऊन जिल्हा रुग्णालयाकडे येत होते. कारवांचीवाडी फाट्याजवळ आल्यावर अचानकपणे मुख्य रस्त्यावर येणारी दुचाकी (क्र एमएच-०९ जीवाय १५६२) ही समोर आल्याने अपघात झाला. रुग्णवाहिकेच्या पुढच्या बॉनेटला दुचाकी धडकली. या अपघातामध्ये स्वार किरण रामंचद्र नवले (वय ३०) मयुरी किरण नवले (वय ३०), मुलगा-श्रेयस, व मुलगी-श्रद्धा (सर्व रहाणार परेल, नीनाई- शाहूवाडी-कोल्हापूर) ही गंभीर जखमी झाली. यामध्ये श्रेयस व किरण यांच्या डोक्याला तर मयुरी-श्रद्धा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. चौघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यत सुरु होती. पुढील तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.