जिल्ह्यात नव्याने 71 कोरोना पॉझिटीव्ह; तीन जणांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. आज नव्याने 71 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 3787 झाली आहे. तर जिल्ह्यात आज 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.       

आज नव्याने आरटीपीसीआर मधील रत्नागिरी 7, लांजा 5, कळंबणी 8 तर ॲन्टीजेन  टेस्ट मधील रत्नागिरी 37, खाजगी हॉस्पीटल 14 असे एकूण 20 + 51 =71 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.   

आज जिल्ह्यात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.पांगारी, तालुका संगममेश्वर येथील 65 वर्षीय रुग्ण, वेरळ, ता. खेड येथील 75 वर्षीय रुग्ण,  चिपळूण येथील 52 वर्षीय रुग्ण या रुग्णांचा समावेश आहे. यानंतर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 132 जणांचा मृत्यू झाला आहे.