रत्नागिरी:- मागील चोवीस तासात पुन्हा 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसात 35 रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत 159 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही ही मात्र दिलासादायक बाब ठरली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 143 रुग्ण उपचाराखाली आहेत.
नव्याने 18 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 850 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 159 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 55 हजार 220 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 10 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 323 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 320 असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.04 टक्के आहे