जिल्ह्यात तीन कोरोना बाधितांचा मृत्यू; 66 नवे रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना बाधित तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील तर एक खेड मधील आहे. याशिवाय जिल्ह्यात 66 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 3 हजार 641 इतकी झाली आहे. 
 

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांपैकी आरटीपीसीआर टेस्ट मधील रत्नागिरीतील 43 तर ॲन्टीजेन  टेस्ट मधील रत्नागिरी 5, कळबणी 5, लांजा 1, परकार हॉस्पीटल 10 घरडा हॉस्पीटल 2 असे एकूण 43 + 23 एकूण 66 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.  

गुरुवारी 93 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून यात जिल्हा शासकीय रुग्णालय येथील 11, कळबणी 1, संगमेश्वर 2, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 48, घरडा 29, पेढांबे  येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 324 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

दरम्यान मागील 24 तासात 3 जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 127 वर पोचली आहे. मागील 24 तासात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये निवळीफाटा, ता. रत्नागिरी  1 रुग्ण, कुवारबाव, ता.रत्नागिरी – 1 रुग्ण – वय – 45वेरळ, ता. खेड – 1 रुग्ण यांचा समावेश असून जिल्ह्यत सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 1 हजार 190 आहेत.