रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील चोवीस तासात 106 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर कोरोना बाधित दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून मृत्यूसंख्या देखील 151 वर पोचली आहे. मागील चोवीस तासात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात एकही बाधित रुग्ण सापडून आलेला नाही.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. मागील चोवीस तासात तर कोरोना बाधित रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे. चोवीस तासात 106 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.यात 22 रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट केलेले तर तब्बल 84 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत.
सर्वाधिक रुग्ण पुन्हा रत्नागिरी तालुक्यातच सापडले आहेत. तालुक्यात 56 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 19 रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट केलेले तर 37 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. मंडणगड तालुक्यात 1, खेड 20, गुहागर 13, चिपळूण 15 आणि राजापूर तालुक्यात 1 रुग्ण सापडून आला आहे. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 5067 झाली आहे.
मागील चोवीस तासात कोरोना बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी एकजण रत्नागिरीतील 1 आणि संगमेश्वर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 151 वर पोचली आहे.









