1 हजार 299 रुग्ण कोरोनामुक्त
रत्नागिरी:- जिल्ह्यात 1 हजार 299 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 69 टक्क्यांवर पोहचले आहे. प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात 55 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 881 झाली आहे. एका वृद्धाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 20 रुग्ण, कळबणी 17 रुग्ण, कामथे 10 रुग्ण, दापोली – 3 रुग्ण, रायपाटण 1 रुग्ण आणि देवरुख येथील 4 रुग्ण आहेत. दरम्यान कापडगाव, रत्नागिरी येथील 78 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 61 झाली आहे.
रविवारी 47 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजर 299 झाली आहे. रविवारी बरे झालेल्यांमध्ये कोव्हीड रुग्णालय 11, समाजकल्याण 11, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही दापोली 1, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 12, कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल मधील 12 रुग्ण आहेत.









