Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी गोडावून स्टॉप येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

गोडावून स्टॉप येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- छातीत जळजळ व चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. राजेंद्र पांडुरंग कळंबटे (वय ५०, रा. कोहिनूर व्हॅली व्ह्यू, गोडावून स्टॉप, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी सात च्या सुमारास परकार हॉस्पिटल येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र कळंबटे हे घरात बसले असताना त्यांच्या छातीत जळजळ होऊन चक्कर आली. बेशुद्ध अवस्थेत त्यांना उपचारासाठी परकार हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.