रत्नागिरी:- जिल्ह्यात आज तब्बल 1322 रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढल्याचे दिलासादायक चित्र आहे. नव्याने 482 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर 6 हजार 045 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 17 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
नव्याने 482 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 60 हजार 045 इतकी झाली आहे. बुधवारी 6 हजार 045 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आता पर्यंत 3 लाख 51 हजार 349 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 1322 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आता पर्यंत 52 हजार 631 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 87.74 टक्के आहे.
गेल्या चोवीस तासात 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 हजार 721 कोरोनाबळी गेले आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर 2.87 % इतका आहे. आज अखेर 5 हजार 693 रुग्ण उपचाराखाली आहेत.