रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आल्याचे चित्र आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात अवघे 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 565 झाली आहे.
मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. नव्याने दहा रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 565 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 66 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 49 हजार 553 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सोमवारी 12 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 085 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाचाही मृत्यू झालेला नाही. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये दापोलीतील 3, खेड 2, लांजा 1 आणि संगमेश्वर तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे.