रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत बुधवारी (ता. ८) २७ हजार ३१२ नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये पहिला डोस 19 हजार 859 आणि दुसरा 7 हजार 453 नागरिकांना देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिली मात्रा ५ लाख ६३ हजार २८ आणि दुसरी मात्रा २ लाख ४३ हजार ४३२ अशी एकूण ८ लाख ६ हजार ४६० मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले होते. सुरवातीला लसीचा पुरवठा कमी होत होता. त्याही परिस्थितीमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात मात्रा पोचवण्यात येत होत्या. आतापर्यंत पूर्ण १८ ते ४४ वयोगटातील पहिला डोस दिला गेलेल्यांचे प्रमाण ३३.६४ टक्के, दुसरा डोस घेतलेल्याचे प्रमाण ६.६७ टक्के आहे. ४५ ते ६० वयोगटातील लोकांना पहिला डोस ५६.७१ टक्के तर दुसरा डोस २८.८२ टक्के लोकांनी घेतला आहे. ६० पेक्षा अधिक वयाच्या ६१.७७ टक्के लोकांनी पहिला तर दुसरा डोस ३४.९० टक्के नागरिकांनी घेतला आहे. लसीकरण मोहिमेला जिल्हयात गती देण्यासाठी आरोग्य यंत्रणा घेत असलेल्या परिश्रमांबद्दल आरोग्य समितीत आरोग्य विभागाचा अधिकारी वर्ग आणि आरोग्य कर्मचार्यांचे उपाध्यक्ष उदय बने यांनी कौतुक केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी लसीकरण मोहीमेची सभागृहाला माहिती देताना ८ लाख ६ हजार ४६० नागरिक पूर्णपणे सुरक्षित करण्यात यश आल्याचे सांगितले.