रत्नागिरी:- जिल्ह्यात उद्या 31 जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहिमेचा लाभ ग्रामीण भागामध्ये 74273 व शहरी भागात 13383 असे एकुण 87656 लाभार्थींना लस दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 1852 व शहरी भागात 83 लसीकरण बुथ स्थापन करण्यात आलेले आहेत. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये एकही बालक पोलिओ लसीकरण पासुन वंचित रहाणार नाही यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जि.प.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली आहे.
या मोहिमेसाठी 36 ट्रान्झीट टीम रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथे नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच 113 मोबाईल टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. एकुण 4106 कर्मचाऱ्यांची लसीकरण केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची लस दया जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओमुक्त जग करण्याचा निर्धार केलेला आहे. त्यानुसार युध्द पातळीवर सर्व स्तरावर पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.
लसीकरण मोहिमेमध्ये 0 ते 5 वर्षे पोलिओमुक्त भारत व महाराष्ट्र हे आपले स्वप्न साध्य झाले आहे. रत्नागिरी पल्स पोलिओ मोहिम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबित कमलापूरकर यांचे मार्गदर्शनाखाली अमलबजावणी दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी ग्रामिण व शहरी भागात करण्यात आली आहे. लसीकरण करताना कोविड 19 साथीच्या कालावधीमध्ये कशा पध्दत्तीने दक्षता घ्यावी याबाबत जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले आहे.