रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात आणखी 50 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 3575 झाली आहे.
नव्याने सापडलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरीतील 26 तर ॲन्टीजेन टेस्टमधील रत्नागिरी 4, कळबणी 6, कामथे 2, चिपळूण 3, दापोली 8, परकार हॉस्पीटल 1 येथील एकूण 50 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातआज दळवटणे, चिपळूण येथील एका 48 वर्षीय कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 124 मृत्यू झाले आहेत.