रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत असले तरी बाधित रुग्णांचा मृत्यू होण्याची संख्या मात्र वाढत आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा 261 वर गेला आहे. याशिवाय मागील 24 तासात 64 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
नव्याने सापडलेल्या 64 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 10 जण आरटीपीसीआर तर 54 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. सर्वाधिक 35रुग्ण रत्नागिरीतील तर चिपळूण तालुक्यात 11 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय खेड 2, संगमेश्वर 16 रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान मागील चोवीस तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 261 वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या पाच रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 2, चिपळूण, लांजा आणि गुहागर मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.









