जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींचे काम ठप्प

रत्नागिरी:- जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज सोमवारपासून ठप्प झाले आहे. संगणक परिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच आता ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्ह्यातील 118 ग्रामविकास अधिकारी व 439 ग्रामसेवक आंदोलनात उतरले आहेत. त्याला अखिल भारतीय सरपंच परिषदेनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गावगाड्याच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

गेले काही दिवस संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. त्याला आता सरपंच परिषद, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे.

ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या मागण्या : ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पद एकत्र करून पंचायत विकाम अधिकारी पद निर्माण करणे,ग्रामसेवक कडील अतिरिक्त काम कमी करावीत, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 ने कलम 49 मध्ये सर्व जिल्हा परिषद च्या प्राप्त अहवालानुसार सुधारणा करणे, शिक्षकांप्रमाणेन प्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधिाच द्यावे.

ग्राम रोजगार सेवकांच्या प्रमुख मागण्या: अर्धवेळ एवजी पुर्ण वेळ कर्मचारी म्हणून नेमणूक करून किमान पंभरा हजार मानगण द्यावे, विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्राम रोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे.

महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक मागण्या :संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून दर्जा देनून 20,000 रुपये बेतन देण्यात यावेत,संगणक परिचालकांवर नव्याने लादलेली चुकीची टार्गेट सिस्टिम रद करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याः माननीय अभय यावलकर समितीच्या शिफारसी स्वीकारून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचा-याप्रमाणे बेतनश्रेणी लागू करण्यात यावी, ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम 61 रद करणे, रा ज्यातील ग्रामपंचायत कर्मचान्यांना पेन्शन मिळावी, चेतनासाठी बसुलीची अट रह करावी. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथजी शिदि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व अजित दादा पवार यांच्यासह ग्राम विकास मंत्री गिरीजी महाजन व संदिपान भुमरे यांना देण्यात आल्या आहेत.