जिल्ह्यातील बडे अधिकारीच सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात; आता पोलीस अधीक्षकांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील बडे अधिकारी सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत आहेत. जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या बदलीचे खोटे आदेश व्हायरल झाले असताना जिल्हा पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. याचा तपास वेगाने सुरू आहे. 

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्या बदलीचा बनावट जीआर काढल्याप्रकरणी पोलीस तपास सुरू असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला सायबर फसवणुकी जागृती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणारे  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्याच नावाने फेसबुकवर फेक अकाउंट  उघडल्यात आल्याचे उघड झाले आहे.  

रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी काही नागरीकांच्या बाबतीत हा प्रकार घडला होता. फेक अकाउंटद्वारे लोकांना फसविण्याचे काम सायबर गुन्हेगार करीत असतात  पण आता खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांच्या नावाने कोणीतरी अज्ञातांने फेक  फेसबुक अकाऊंट  उघडल्याचे  साेमवारी उघड झाले आहे. या नावाने जर रिक्वेस्ट आली तरी कोणीही स्वीकारू नये, असे आवाहन डॉ. गर्ग यांनी केले आहे. नागरिकांनी सोशल मिडियाचा वापर करताना जपून करावा व काही गैरप्रकार आढळला तर रत्नागिरी सायबर सेलच्या ८८८८९०५०२२ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.