जिल्ह्यातील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विनीत चौधरी यांच्याकडे पुन्हा शहर पोलीस निरीक्षक पदाची धुरा

रत्नागिरी:-जिल्ह्यातील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. तसे आदेश नुकतेच जिल्हापोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिले. ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनित चौधरी यांची पुन्हा शहर पोलिस ठाणे, तर रविंद्र शिंदे यांची चिपळूण येथे बदली करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात देवरुखचे निरीक्षक मारूती जगताप यांची नियुक्ती केली आहे.

राज्य आणि विभाग स्तरावरील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरी, रायगड येथील तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. नवे पोलिस अधिकारी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर जिल्हाअंतर्गत या बदल्या करण्यात आल्या आहेत. शहर पोलिस निरीक्षक म्हणून विनित चौधरी, ग्रामीण पोलिस निरीक्षक म्हणून मारूती जगताप, चिपळूण रविंद्र शिंदे, दापोली नितीन ढेरे, जयगड सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर, देवरूखला बाळकृष्ण जाधव, लांजा दादासाहेब घुटुकडे, दाभोळला श्री. हिरेमठ, गुहागर श्री. जाधव, तर गुहगारचे पोलिस निरीक्षक अरविंद बोडगे  यांची बदली नियंत्रणक कक्षात करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. गर्ग यांनी दिले आहेत.