रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाने जोर धरलेला असून आता तर हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर नैसर्गिक आपत्ती आणि पावसाळ्यात उद्भवणाऱया साथींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील जोखीमग्रस्त 16 गावे आणि नदीकाठची 206 गावांमध्ये पावसाळयात साथीचा उद्रेक वाढू नये यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे.
पावसाळ्याच्या काळात जिल्ह्यात साथ रोगांचा उद्रेक होऊ नये म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पावसाळ्याच्या काळात घ्यावयाच्या खबरदारीचे नियोजन केले आहे. यापूर्वी जिल्ह्यात साथरोगांनी डोके वर काढलेल्या गावांमध्ये आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सतर्प राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर जोखीमग्रस्त 16, तर नदीकाठच्या 206 गावांची यादी जिल्हा आरोग्य विभागाने यापूर्वीच जाहीर केली आहे. या गावांवर आरोग्य विभागाने विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संभाव्य पुरग्रस्त जोखीमग्रस्त गावांच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मागील 5 वर्षात डेंग्यु, चिकुनगुन्या, गॅस्टो, अतिसार, कॉलरा, विषमज्वर, ताप उद्रेक, हिवताप, काविळ, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींचा झालेल्या गावांवर जिल्हा परिषद आरोग विभागातर्फे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सद्या जिल्हाभरात पावसाचा जोर वाढलेला आहे. हवामान विभागाने तर 9 जुलैपर्यंत पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन पशासनाने केलेले आहे. त्यातच वातावरण बदलामुळे सद्या सर्दी, तापाच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे.
या गावांमध्ये पाथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी संभाव्य पुरग्रस्त ठिकाणी तात्काळ भेट देऊन उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आरोग्य कर्मचारी व पर्यवेक्षक यांनी वेळोवेळी भेट देऊन साथरोग विषयक पाहणी करणे. नियमित सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या गावांतील दरमहा पाणी नमुने व टी.सी.एल. नमुने गोळा करून पयोगशाळेकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर 24 तास वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्याही गावात वाडी वस्त्यांमध्ये साथरोगांची लागण झाल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी नजिकच्या पाथमिक आरोग्य केंद्राकडे संपर्प साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यातील आजारांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तर व पाथमिक आरोग्यकेंद्राच्या ठिकाणी औषध साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. तसेच इमर्जन्सी किट तयार केल्या आहेत. पत्येक पाथमिक आरोग्य केंद्रात वेद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी घरोघरी मेडिक्लोर वाटप व आरोग्य शिक्षण कार्य करण्याच्या सूचना जि.प.आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
गेल्या 5 वर्षात जिल्ह्यात साथ उद्रेक झालेली गावेः
खेड-सवेणी (डेंगी), खेड शहर (कावीळ, डेंगी), वावे (डेंगी), आंबवली (अन्न विषबाधा), दापोली-पिसई (अन्न विषबाधा), आसुद (विषमज्वर), चिपळूण- कातळवाडी (गोवर), कोसंबी (गोवर), फुरुस (गोवर), सावर्डा (अतिसार) डेरवण (कावीळ), खेर्डी (डेंगु). गुहागर- अडुर (अन्न विषबाधा). रत्नागिरी-खानू (कॉलरा), वाटद (डेंगु), राजापूर-सोलगाव (गॅस्ट्रो एंट्रायटीस).
जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांची संख्याः
मंडणगड-26, दापोली 39, खेड 47, चिपळूण 67, गुहागर-21, संगमेश्वर-30, रत्नागिरी-40, लांजा 15, राजापूर-47.









