जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चिपळूणात 5 दुकान चालकांवर गुन्हा

चिपळूण:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दुकाने चालू व बंद करण्यासाठी घालून दिलेल्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यात 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महेश विष्णू भंडारी (45, पेढे, चिपळूण), सुधीर रामदास जाधव (50, वालोपे बौद्धवाडी, चिपळूण), उमेश सखाराम आयरे (39, वालोपे, देऊलवाडी, चिपळूण), दीपक आनंद झेंडेकर (47, कलंबसते, चिपळूण), मंगेश बबन जडयाल (39, बहादूर शेख नाका, चिपळूण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकान चालकांची नावे आहेत.