जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

पोलीस मुख्यालयात वाढते रुग्ण 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली. अधिकारी पॉझिटिव्ह निघाल्याने संबंधित विभाग तत्काळ रिकामा करण्यात आला. या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची तपासणी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. 
 

दरम्यान पोलिस मुख्यालयात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. पोलीस मुख्यालयातील पती-पत्नीसह आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासह मेंटल हॉस्पिटल आणि साळवी स्टॉप येथे नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.