रत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस परिसरातील रहिवासी प्राची प्रमोद शिंदे(सी ब्रीझ अपार्टमेंट) हिने जाधव कुटुंबियांना जातीवाचक व अश्लिल शिवीगाळ केली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयित प्राची प्रमोद शिंदे हिने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
यासंदर्भात अधिक वृत्त असे की, दि. ३/ ८/ २१ रोजी दुपारच्या सुमारास प्राची प्रमोद शिंदे हिने त्याच इमारतीत राहणाऱ्या जाधव कुटुंबियांना जातीवाचक व अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी प्रशांत जाधव यांनी आपणास व कुटुंबियांस होणाऱ्या शिवीगाळीबाबत रत्नागिरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
दरम्यान, संशयित आरोपी शिंदे हिच्यावर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याची गंभीरता पाहता संशयित आरोपी प्राची प्रमोद शिंदे हिने केलेला जामिन अर्ज मा. जिल्हा सत्र न्यायालयाने दि .10 रोजी फेटाळून लावला आहे. तसेच संशयित आरोपी वंदना ऊर्फ प्राची शिंदे हिने केलेल्या शिवीगाळी प्रकरणी फूस लावण्याचा आरोप असलेल्या प्रमोद आत्माराम शिंदे यास पंधरा हजारांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला
आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड . प्रफुल्ल साळवी तर तक्रारदाराच्या वतीने अॅड. शिवराज जाधव यांनी जामीन अर्जाला विरोध करताना जोरदार युक्तीवाद केला.