दापोली:- जागेची मोजणी करताना समज व लेखी नोटीस का दिली नाही, याची अधिकाऱ्यांना विचारणा केल्याच्या रागातून ८ संशयितांनी मारहाण केली. अशी तक्रार दापोली पोलिस ठाण्यात एका महिलेने दाखल केली आहे. हा प्रकार दापोली तालुक्यातील वेळवी कलानगर येथे शुक्रवारी (ता. २४) दुपारी घडला. दापोली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या जागेची मोजणी सुरू होती. कलानगर कुंभारवाडी येथे राहणारी एक ५५ वर्षीय महिला व तिचे पती येथील पडवीत बसले होते. जमिनीलगत जमीन असूनही लेखी नोटीस आली नाही म्हणून अधिकारी यांना विचारणा केली. संशयित मिलिंद तुकाराम इवलेकर, अशोक तुकाराम इवलेकर, उदय इवलेकर, विलास काशिराम आंजर्लेकर, विशाल विलास आंजर्लेकर, सुवर्णा निवलकर, भाग्यश्री दाभोळकर, रूही रूपेश केळसकर यांनी मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार या महिलेने दाखल केली आहे.