रत्नागिरी:- शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावर लोखंडी गेट घालून फिर्यादी यांची वाहनाचा रस्ता अडवून सरकारी मोजणीच्या खाणाखूणा नष्ट केल्या. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र बैजनाथ दामले (रा. शिरगांव, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २२) सकाळी सातच्या सुमारास शिरगाव येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पुष्कर माधव दामले (वय ५७, रा. सध्या डोंबिवली (पूर्व) जि. ठाणे, मुळ ः शिरगाव-रत्नागिरी ) यांना पाहून संशयिताने शिरगाव ग्रामपंचायतीने काढलेले गेट मी परत लावले तुला माहित आहे. कलेक्टर माझा माणूस आहे. तु आता इथून जिवंत कसा जातोस ते मी पाहतो अशी धमकी दिली. तसेच न्यायालयाने आदेश आणि संपुर्ण मिळकत सर्व्हे न ६२ हिस्सा नं २ अ (२-१) या मिळकतीमध्ये बेकायदेशीरपणे लोखंडी गेट घालून तसेच गडगा बांधून व शिरगाव ग्रामपंचायतीच्या रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट घालून फिर्यादी पुष्कर दामले यांच्या चारचाकी वाहनाचा रस्ता अडविला. व सरकारी मोजणीच्या खाणाखुणा नष्ट केल्या. या प्रकरणी पुष्कर दामले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









