जांभी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- तालुक्यातील कुटरे बौद्धवाडी येथील जांभी नदीच्या पात्रात एका २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २० मे २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. साहिल संदीप कदम (वय २६, रा. कुटरे बौद्धवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल कदम हा २० मे रोजी सायंकाळपासून बेपत्ता होता. नातेवाईक व मित्रपरिवार त्याचा शोध घेत होते. आज, २१ मे २०२५ रोजी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास कुटरे बौद्धवाडी येथील जांभी नदीच्या पात्रातील पिंपळाचा डोह या ठिकाणी साहिलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

त्याला तात्काळ पाण्याबाहेर काढून उपचारासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. साहिलचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेने कुटरे बौद्धवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. आकस्मिक मृत्यू क्रमांक १७/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे या घटनेची नोंद करण्यात आली असून, चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत.