जलशुध्दीकरण केंद्रामधील जुन्या भंगाराची चोरी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील साळवीस्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्राचे जुने भंगार रिक्षातून चोरुन नेल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना 15 मार्च रोजी रात्री 9 ते 16 मार्च रोजी सकाळी 6 वा.कालावधीत घडली आहे.

विशाल श्रावण चव्हाण (20, रा.साळवीस्टॉप, रत्नागिरी) आणि अन्य एकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात वैदेही विनोद चव्हाण (रा.रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानूसार, त्या रत्नागिरी नगरपरिषदेत गाळवी चालक व प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नियुक्तीस आहेत.15 मार्च ते 16 मार्च या कालावधीत या दोन संशयितांनी रिक्षामधून जलशुध्दीकरण केंद्राचे जुने भंगार चोरुन नेले. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.