रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ, पालिका वाचनालयाच्या समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाम्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) सकाळी दहा ते सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयुर आनंद पिलणकर (वय २८, रा. खडपेवठार, रत्नागिरी) यांनी दुचाकी (क्र. एमएच-०८ एके ०४४६) ही नगरपरिषदेच्या वाचनालयाच्या समोर जयस्तंभ येथील भाट्येबीचकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.