जयस्तंभ येथील मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल

रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ येथील जिल्हाधिकारी कार्यालगत मारुती मंदिर देवळाजवळ झालेल्या हाणामारी प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध परस्पर विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल कोळी, त्यांचे वडिल, आई, सुनिल कोळी यांचा भाऊ (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) असे संशयित आहेत. ही घटना बुधवारी (ता. ६) दुपारी चारच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी राजाराम गोपीनाथ सावंत ( रा. झारणीरोड, राममंदिर, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी यांच्या मालकीचा दुकान खोका जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आहे. त्या ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरु असल्याने खोका बाजूला करुन ठेवला आहे. त्या ठिकाणी संशयित सुनिल कोळी हा कलिंगड विक्री करत होता. म्हणून फिर्यादी यांनी मला पानटपरीचा व्यवसाय करायचा आहे असे सांगितले. याचा राग मनात धरुन संशयित सुनिल कोळी याचा भाऊ याने हातातील धारदार सुरीने डोक्यावर मारुन दुखापत केली. राजाराम सावंत यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तर फिर्यादी अनिल सायबन्ना तळवार (वय १८, रा. खडपेवठार, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी अनिल तळवार यांचा कलिंगडाचा धंदा आहे. संशयित राजाराम सावंत यांनी तुम्ही इथे कलिंगडाचा धंदा करायचा नाही तुम्ही इथुन दुसरीकडे जा असे सांगुन हाताच्या थापटानी मारहाण केलुन शिवागीळ
केली तर संशयित वैभव सावंत याने तेथील काठी घेऊन फिर्यादी यांच्या पाठीवर व ओठावर मारुन दुखापत केली. तसेच मारण्याची धमकी दिली. व फिर्यादी यांचे शर्ट फाडून नुकसान केले. सोबत संशयित सावंत यांची मुलगी व त्यांची पत्नीही होती.
या प्रकरणी तळवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी आठ जणांविरुद्ध परस्पर विरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहे.