जयगड समुद्रात नेपाळी खलाशाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- जयगड समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या बोटीवर झोपलेल्या नेपाळी खलाशाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वा.सुमारास उघडकीस आली.

रोहित जंगबहादूर चौधरी (47,रा.कैलाला,नेपाळ) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे. याबाबत बोट मालक नितीश तारानाथ नायक यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार,त्यांची बोटी गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी जयगड येथील समुद्रात मच्छिमारी करत असताना बोटीवरील खलाशी जंगबहाद्दूर चौधरी हा रात्री 9 वा.सुमारास जेवण आटोपल्यावर बोटीवरील केबीनमध्ये झोपला होता. त्यानंतर शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वा.सुमारास बोट मच्छिमारी करुन मिरकरवाडा बंदरात आली. तेव्हा बोटीवरील फोरमेन राजेश धनिराम डंगौराने बोटीच्या केबीनमध्ये झोपलेल्या रोहित चौधरीला हाक मारुन उठवले परंतू तो उठला नाही. म्हणून त्याने केबीनमध्ये जाउन त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती.
याबाबत राजेश डंगौराने बोट मालक नितीश नायकला माहिती दिल्यानंतर त्यांनी मिरकरवाडा बंदरात येउन रोहितला उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रोहितला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.