रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड-सडेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयगड पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. शुभम प्रकाश चव्हाण (वय ३२, रा. जुनी तांबट आळी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ४) दुपारी तीनच्या सुमारास जयगड-सडेवाडी, स्मशानभुमी येथील शेडच्या पाठीमागील बाजूस निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटका जुगार चालवत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस शिपाई रजनीकांत घवाळी यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.