जयगड – नांदिवडेत विवाहबाह्य संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

रत्नागिरी:- तालुक्यातील नांदिवडे येथे विवाहबाह्य संबंधातून महिलीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. सुरेश धोंडू पडवळ (64,रा.भंडारवाडा नांदिवडे, रत्नागिरी ) असे मृत पतीचे नाव आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जयगड पोलिसांनी संशयित पत्नी आणि तिचा प्रियकर मनराज चव्हाण (दोन्ही रा.भंडारवाडा नांदिवडे, रत्नागिरी ) या दोघांना रात्री उशिरा अटक केली. या दोघांनी कट रचून कोणत्यातरी हत्याराने सुरेश पडवळ यांच्या हाता पायांवर, छातीवर आणि डोक्यावर वार करून त्यांचा खून केला. याप्रकरणी दोघांवर भादवी कायदा कलम 302,120(ब )अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.