जमीन विक्री व्यवहारातून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

खेड:- वादग्रस्त जमिनीच्या व्यवहाराबाबत ७ लाख ३० हजार रुपये स्वीकारून फसवणूक केल्याच्या प्रकरणात एकावर खेड येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना डिसेंबर २०१८ ते मे २०२३ या कालावधीत घडली. उमेश रामचंद्र कदम असे फसवणूक करण्याचे नाव आहे. फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार खेड येथील सर्व्हे नं. २४२/१, क्षेत्र ०/८५० पो.ख. ०/१५० एकूण १०००, आकार ०-४४ या जमिनीवर न्यायालयात दावा चालू आहे. हे माहीत असूनही त्या जमिनीच्या व्यवहारापोटी त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. कधी रोखीने तर कधी धनादेशाच्या स्वरूपात ७ लाख ३० हजार रुपये स्वीकारले. ही रक्कम परत मिळण्यासाठी विचारणा केली असता सातत्याने चालढकल फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.