जमीन खरेदीच्या नावाखाली ४४ लाखांची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा

खेड:- रायगड जिल्ह्यातील रोहा येथे २० ते ३० एकर जागा उपलब्ध असल्याचे सांगून खरेदीपोटी घेतलेल्या ६४ लाख रूपयांपैकी २० लाख रूपये परत करत ४४ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक राजेंद्र सिंह (५४ रा. दमखाडी-रोहा) याच्यावर ॲड. सुधीर शरद बुटाला यांनी येथील पोलिसात गुन्हा फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २०१९ ते २५ मे २०२२ या मुदतीत घडली. 

ॲड. बुटाला व दीपक सिंह यांचे ६ ते ८ वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंध होते. सिंह हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुटाला यांनी रोहा येथे आपल्याला जागा खरेदी करावयाची असल्याचे सांगितले. त्यानुसार सिंहने बुटाला यांच्याकडून जमिनीबाबत व्यवहारासाठी २० लाख रूपये घेतले होते. मात्र जमीन खरेदीत अडचणी असल्यामुळे घेतलेले २० लाख रूपये त्याने बुटाला यांना परत केल्यामुळे त्याच्यावरील विश्वास वाढला. याचा फायदा घेत सिंह याने रोहा येथे दुसऱ्या ठिकाणी २० ते ३० एकर जागा उपलब्ध असल्याचे सांगून ॲड. बुटाला यांच्याकडून ६४ लाख रूपये घेतले होते.