रत्नागिरी:- भावाच्या नावावर जमिन करण्यासाठी पैसे घेउनही जमिन नावावर न केल्याप्रकरणी जाब विचारल्याच्या रागातून महिलेला तिच्याच 6 नातेवाईकांनी मारहाण केली. ही घटना सोमवार 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.15 वा.ओमकार रेसीडेन्सी नाचणे येथे घडली.
दिलीप किर, रुपाली किर, अमृता खेडेकर, श्रध्दा निमगरे, अनुजा किर, प्रसाद खेडेकर (सर्व रा.रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनुजा किर ही फिर्यादी महिलेची मावस बहिण आहे. तिच्या सोबत भांडण झाले त्यावेळी फिर्यादीने तिला माझ्या भावाच्या नावावर जमिन करण्यासाठी पैसे घेउनही जमिन नावावर करुन का दिली नाही असे बोलली होती.
याचा राग मनात धरुन सोमवारी सायंकाळी 6 संशयितांनी फिर्यादीच्या घरात घुसून संगनमताने तिला मारहाण केली. यात तिच्या अंगावरील कपडे फाडून गळ्यातील मंगळसूत्र व हातातील ब्र्रेसलेट तोडून नुकसान केले. या सर्व प्रकारात फिर्यादी महिला वाचवा वाचवा असे ओरडत घराबाहेर आली असता तिथेही तिला संशयितांनी मारहाण केली.