जखमी अवस्थेत आढळलेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील खानू येथील रस्त्याच्याकडेला जखमी अवस्थेत आढळलेल्या वृद्धास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. सिताराम दत्ताराम पवार (वय ७७ रा. आसुर्डे, पाली, रत्नागिरी. सध्या सुंदरनगर जांभुळफाटा, मिरजोळे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना २६ सप्टेंबरला घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिताराम पवार हा वृद्ध २६ ला जखमी अवस्थेत खानू येथे आढळला. तेथील लोकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना बुधवारी (ता.२) दुपारी अडीच च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.